प्रज्ञा एजुकेशनल अंड सोशल वेल्फेअर सोसायटी

धामणगाव गढी येथे हळदी कुकवाचा प्रोग्राम घेण्यात आला यामध्ये गावातील शेकडो महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांचे फोटो पूजनाने कार्यक्रम सुरु झाला. महिलांनी दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमामधे  सहभाग घेऊन उत्कृष्ट उखाणे सांगितले. सौ. पद्मा नन्नावरे (मुख्याध्यापिका), सौ. आश्विनी दहेकर, सौ. दुर्गा रौन्दलकर, कु. प्रिया विलास कान्होलकर (सर्व शिक्षिका) आणि वर्षाताई चिंचोळकर (काळजी वाहक) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. सकाळी ११ ते ४.३० पर्यंत कार्यक्रम सुरूच राहिला गावातील सर्व महिलांनी पुढील वर्षी मोठा मंडप टाकून कार्यक्रम घेण्यास सुचविले. कारण खूप मोठ्या प्रमाणावर महिला उपस्तीत होत्या.